माजी खासदार विनायक राऊत यांनी राठीवडे गावाला दिली सदिच्छा भेट.

संतोष हिवाळेकर/पोईप

रत्नागिरी सिंधुदुर्ग चे माजी खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच राठीवडे गावाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांचे सोबत मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर,राठीवडे सरपंच दिव्या धुरी, उपसरपंच जाधव, माजी उपसरपंच स्वप्नील पुजारे, जेष्ठ कार्यकर्ते व समाज सेवक सुभाष धुरी, जयराम गांवकर, विभाग प्रमुख बंडु चव्हाण, विजय पालव, नितीन पालव, माजी सरपंच रामचंद्र राऊत, युवा सेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले,
संतोष धुरी, सुशांत धुरी, भगवान धुरी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व प्रथम राठीवडे गावचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन व आशीर्वाद घेतले या वेळी राठीवडे गावाच्या वतीने सरपंच दिव्या धुरी उपसरपंच स्वप्नील पुजारे, सुभाष धुरी, जयराम गांवकर यांनी माजी खासदार विनायक राऊत यांचा सत्कार केला.नंतर माजी उपसरपंच स्वप्नील पुजारे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले.या मध्ये दिगंबर पुजारे व त्यांचे सुपुत्र भुषण यांनी साकारलेली गणेश मूर्ती व देखावे सजावट पाहून सर्वांचे मन प्रसन्न झाले.तेथेही पुजारे कुटुंबियांच्या वतीने शाल , श्री फळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.नंतर निष्ठावंत व जेष्ठ कार्यकर्ते सुभाष धुरी यांच्या निवासस्थानी भेट देऊन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून पक्ष वाढीबाबत व विकासा बाबत आढावा घेतला माजी खासदार विनायक राऊत यांनी कार्यकर्त्यांना खचुन न जाता जोमाने काम करा आगामी काळात सत्ता आपलीच आहे असा विश्वास दिला आहे.शेवटी सुभाष धुरी यांनी माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या राठीवडे गावाला सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले व येथील विविध विकास कामांचा आढावा घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!