गोव्यात एकावर जीवघेणा हल्ला

दोन सराईत गुन्हेगारांना दोडामार्गातून अटक

दोडामार्ग : दोडामार्गात एकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना दोडामार्गातून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दोडामार्ग परिसरात खळबळ उडाली आहे.

गोव्यात सध्या रामा काणकोणकर हल्ला प्रकरण गाजत आहे. या प्रकरणातील सराईत गुन्हेगार असणारे अँथनी नादार व फ्रान्सिस नादार हे दोडामार्ग बस स्थानकाच्या जवळ असणाऱ्या एका रेस्टॉरंट मध्ये राहत होते. गोवा पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच गुरुवारी सायंकाळी त्यांनी दोडामार्ग येथून दोन्ही गुन्हेगारांना अटक केली. याबाबतची माहिती गोवा पोलिसांनी दिली असून या कारवाईमुळे दोडामार्ग परिसरात खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!