दारूच्या नशेत आईला जीवे मारणाऱ्या मुलाला पोलिस कोठडी

कणकवली : दारूच्या नशेमध्ये आपल्या आईचा खूनकरणारा संशयित रवींद्र रामचंद्र सोरफ (वय ४५) याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तालुक्यातील वारगाव सोरफवाडी येथे बुधवारी (ता. १०) रात्री रवींद्र सोरफ याने कोयत्याने डोक्यावर, खांद्यावर वार करून प्रभावती रामचंद्र सोरफ (वय ८०) यांचा खून केला होता. या प्रकरणी रवींद्र याला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले होते. आज त्याला कणकवली न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने रवींद्र सोरफ याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने खूनाचा गुन्हा कबुल केला असला तरी अजून काही बाबींचा तपास करायचा आहे. त्यामुळे न्यायालयाने पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

error: Content is protected !!