पद्मश्री शंकर महादेवन यांच ‘हम गया नही जिंदा है’ हे भक्तीमय गाण प्रदर्शित

स्वामी समर्थांवरील डॉ. प्रसाद अप्पा तारकर दिग्दर्शित आणि पद्मश्री शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजातील भक्तीपूर्ण गीताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिके मिळवून स्थापित केला एक वेगळाच ट्रेंड

हम गया नही जिंदा है स्वामी समर्थांवर आधारित हे गाणे मंदार चोळकर यांनी लिहिले आहे. संगीत प्रवीण कुवर यांनी दिले आहे. आणि या गाण्याचा भारदस्त आवाज पद्मश्री शंकर महादेवन यांचा आहे. या गाण्याला सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाले आहेत. हे गाणे कोलकत्ता, पश्चिम बंगाल, सिक्कीम, डेहराडून, झारखंड, गोवा, पुणे, नेपाळ, मलेशिया, सॅंटियागो, थायलंड, दुबई, कॅलिफोर्निया आणि इतर अनेक देशांसारख्या अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट म्युझिक व्हिडिओ, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट संगीतकार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स असे अनेक पुरस्कार “हम गया नही जिंदा है” या गाण्याने पटकावले. हे गाणे नुकतेच गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ रोजी पॅनोरमा मराठी या संगीत वाहिनीवर प्रदर्शित झाले आहे.


हम गया नही जिंदा है हे गाणे डॉ. प्रसाद अप्पा तारकर यांनी दिग्दर्शित केले आहे. समीर गणेश भुबे यांची निर्मिती आहे आणि यातील कलाकार आहेत उषा नाडकर्णी, जयवंत वाडकर, मयुरी सुभानंद आणि अशोक कुलकर्णी स्वामींच्या भूमिकेत आहेत.
छायांकन राजा फडतरे, संपादन सौरभ नाईक, मेकअप अभय मोहिते, कॉस्च्युम डिझायनर मयुरी शुभानंद यांनी केली आहे. DI कलरिस्ट योगेश दीक्षित आहेत. आणि vfx कलाकार दिवाकर घोडके. प्रसिद्धी विनया सावंत (Forever PR) या सर्वांनी या बाजून उत्तम सांभाळल्या आहेत. प्रोडक्शन सुमेध कांबळे आणि सहाय्यक सौरभ गोडसे करत आहेत. पद्मश्री शंकर महादेवन यांच्या दैवी आवाजातील हम गया नहीं जिंदा है हे गाणे प्रेक्षकांना अतिशय आवडत आहे. “हम गया नही जिंदा है” या स्वामींच्या पुण्य वचनाला उत्तम रीतीने सादर करण्यात आले आहे. हे गाणे श्रवणीय आहेच पण हे पाहताना आपण भक्तीत लिन होऊन जाऊ हे नक्की.

YouTube player
error: Content is protected !!