कातकरी समाजासाठी चार घरकुलांचे भूमिपूजन.
संतोष हिवाळेकर / पोईप
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजाला इतर समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री जनमन आवास योजना कार्यान्वित केली असून मालवण तालुक्यातील मालोंड बेलाचीवाडी येथे चार कातकरी कुटुंबांना मंजूर झालेल्या घरकुलाचे भूमिपूजन शनिवारी मालवण पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. मालोंड बेलाचीवाडी येथील ग्रामस्थ अशोक मनोहर गिरगावकर व त्यांचे बंधू मोहन मनोहर गिरगावकर यांनी आपली जागा शासनाला उपलब्ध करून दिली. सन 2024-25 या सालामध्ये घरकुल मंजूर झालेली होती याच घरकुलांचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता सामंत, माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, ग्रामपंचायत मालोंड बेलाचीवाडी सरपंच पूर्वा फणसगावकर, उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, ग्राप सदस्या भारती घाडीगावकर, मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, सब रजिस्टर मालवणचे हिंदळेकर साहेब, कातकरी समाजाचे अध्यक्ष आईर, कृषी विस्तार अधिकारी गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी विनायक जाधव, कृषी विस्तार अधिकारी सुनील चव्हाण, मालोंड ग्रामपंचायत अधिकारी मनस्वी कुणकवळेकर, वडाचापाट ग्राप अधिकारी महेंद्र मगम, डाटा ऑपरेटर मालोंड स्नेहल पारकर, मालोंड पोलिस पाटील हर्षद घाडीगावकर, बेलाचीवाडी पोलीस पाटील अक्षता मालोंडकर, मालोंड बेलाचीवाडी तलाठी जाधव, जमीन मालक अशोक गिरगावकर, अर्चना गिरगावकर, मोहन गिरगावकर, समीर परब (पोईप), या योजनेचे लाभार्थी नारायण पवार, महेश पवार, संग्राम पवार, नितेश पवार व कातकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण म्हणाले की शासनाने कातकरी समाजासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना अमलात आणलेले आहेत. यात प्रामुख्याने कातकरी समाजासाठी वीज, पाणी, रस्ता व घरकुल आदी बाबींचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उपेक्षित राहिलेल्या कातकरी समाज बांधवांना प्रत्येक तालुका स्तरावर पंचायत समितीच्या वतीने घरकुले मंजूर करून त्यांना निवासाची व्यवस्था करण्यासाठी शासनाकडून योग्य तो पाठपुरावा चालू करण्यात आलेला आहे. मालवण तालुक्यातील इतरही कातकरी कुटुंबांना जागेची उपलब्धता झाल्यास त्यांच्या घरकुलाचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी दिले.
.













