काळ आला होता पण … वेळ आली नव्हती

हळवल गडनदी पुलावर कंटेनर ला अपघात

अन्यथा कंटेनर गडनदी पात्रात कलंडला असता

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाटा नजीकच्या गडनदी पुलावर मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर (MH 12 LT 7309 ) चा अपघात झाला. सदरचा अपघात हा गुरुवारी पहाटे ३:३० ते ४ वा. च्या. सुमारास घडला असल्याची प्राथमिक माहिती समजली. अपघाताची स्थिती पाहता “काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती’ असच म्हणावं लागेल. कारण ओरोसहून रत्नागिरीच्या दिशेने निघालेला हा कंटेनर कणकवली येथील हळवल फाटा नजीक गडनदी पुलावरील ब्रिजच्या कठडा आणि पदचाऱ्यांच्या मध्यभागी चढला. संरक्षक कठड्याला अडकल्याने पुढील जीवित व वित्तहानी टळली आहे. याबाबत अधिक माहिती समजू शकली नाही.

error: Content is protected !!