सावंतवाडी : एका महिलेला मोबाइलवर अयोग्य संदेश पाठवून आणि नंतर तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका व्यक्तीला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गालिब चांद कोंडी (वय ३५, सध्या रा. आचरा, मालवण; मूळ रा. सिंदगी, जि. विजापूर, कर्नाटक) याने एका महिलेला मोबाइलवर अयोग्य संदेश पाठवले होते. याबाबत महिलेने त्याला जाब विचारला असता, त्याने विनयभंगाचे वर्तन केले.
याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गालिब कोंडी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आणि त्यानंतर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलिस करत आहेत.