लाडकी बहिण योजनेत होणार मोठा बदल
मुंबई प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे विधानसभा निवडणूक मतदान निर्णायक ठरणार अशा चर्चांना उधाण असतानाच आता या योजने बाबत सरकार स्थापने आधीच मोठी अपडेट समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी 14 नोव्हेंबरला मोठी घोषणा केली होती. “महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाईल”, असं गोयल म्हणाले होते.
सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, राज्य सरकारकडून आतापर्यंत 2.34 कोटी लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे.
पियुष गोयल पुढे म्हणाले, पुढील पाच वर्षात त्या वयोगटातील प्रत्येक महिलेला दरवर्षी 1.25 लाख रुपये मिळतील. विरोधी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दरमहा 3000 हजार रुपये देण्याचं आणि राज्य परिवहनच्या एसटीत मोफत प्रवासाची सुविधा देणार असल्याचं आश्वासनं दिलंय. आता महिलांना औपचारिक अर्थव्यवस्थेत नेण्याची आवश्यकता आहे. महायुती महाराष्ट्रात पुन्हा एकदा येईल, असा मला विश्वास आहे. असं वक्तव्य पियूष गोयल यांनी केलं.