राखी पौर्णिमेनिमित्त जिव्हाळा सेवाश्रमात रक्षाबंधन उत्सव

माड्याचीवाडी – राखी पौर्णिमेनिमित्त दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी जिव्हाळा सेवाश्रमात लाभार्थ्यांसमवेत भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव साजरा करण्यात आला. लाभार्थ्यांचे मनोरंजन, विरंगुळा व नैराश्य दूर करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी आश्रमातील ज्येष्ठ भगिनींनी आपल्या मानस ज्येष्ठ भावांना राखी बांधून आनंद व्यक्त केला. त्यानंतर सर्वांना मिठाईचे वाटप करून आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश बिर्जे, श्री. जयप्रकाश प्रभू, सौ. राणी महादेव डोणकरी, कु. गीतांजली बिर्जे तसेच आश्रमाचे सदस्य श्री. अरुण परब उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव यशस्वीपणे संपन्न झाला.


error: Content is protected !!