भाजपा बूथ लेव्हल एक्झीट पोलचा काय आहे अंदाज?

महायुतीत किती जागा विजयी होणार?

एक्झीट पोलचा धक्कादायक अंदाज!

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचे मतदान काल दिनांक २० नोव्हेंबर रोजी पार पाडले असून आता समुर्न महाराष्ट्राचे लक्ष २३ तारीखला होणाऱ्या निकालावर आहे. दरम्यान मतदान संपल्यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने बुथ लेव्हलवरुन माहिती गोळा केली होती. या एक्झिट पोलनुसार विधानसभा निवडणुकीत महायुतीला 164 जागा तर महाविकास आघाडीला अवघ्या 100 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अपक्ष व इतर उमेदवारांना 24 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

महायुती मधे कोणाच्या किती जागा विजयी होतील?

दरम्यान भाजपच्या या बुथ लेव्हल एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महायुतीमध्ये भाजपला 100, शिंदे गटाला 42 आणि अजितदादा गटाला 22 जागांवर विजय मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तर महाविकास आघाडीत काँग्रेसला 40, शरद पवार गटाला 35 आणि उद्धव ठाकरे गटाला 25 जागा मिळण्याची शक्यता आहे.

भाजपाचा बूथ लेव्हल एक्झीट पोल चा अंदाज असला तरी प्रत्यक्षात निकाल काय लागणार, हे मात्र 23 नोव्हेंबरला समजेल.

error: Content is protected !!