खालिद का शिवाजी’ या चित्रपटास जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनासाठी मनाई करावी

समस्त शिवप्रेमींचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

कुडाळ : ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटास जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनासाठी मनाई करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमींनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे सुपूर्त केले आहे.

या निवेदनानुसार ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल अनेक खोटे आणि अनैतिहासिक दावे करण्यात आले आहेत.

उदाहरणार्थ:

१. महाराजांच्या सैन्यात ३५% मुसलमान होते,

२. त्यांच्या अंगरक्षकांपैकी ११ मुसलमान होते,

३. त्यांनी रायगड किल्ल्यावर मशिद बांधली,

४. तसेच चित्रपटाच्या शीर्षकात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे.

यामुळे महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे या निवेदनाद्वारे शिवप्रेमींनी पुढील मागण्या केल्या आहेत.

१. आपल्या जिल्ह्यात सदर’ खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासंबंधी जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृह चालकांना योग्य सूचना याव्यात.

२. या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, प्रसारमाध्यमे तसेच हा चित्रपट पस्देशी पाठवून शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्यात सामील असलेल्या सर्व ज्युरी, अधिकारी, मंत्री तसेच अन्य संबंधितांवर अफवा पसरवणे, अपप्रचार करणे, धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक स्थळांबाबत अपप्रचार करणे या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी.

या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!