श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे बुधवार, दिनांक ३० जुलै २०२५ रोजी अर्थियन आर्ट फाउंडेशन, कांदिवली या संस्थेच्या वतीने तसेच डॉर्फ कॅटल आणि नवदृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्ट फॉर नेचर’ या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पर्यावरण व निसर्ग संवर्धन या विषयावर तज्ञ व मार्गदर्शक अक्षय शिंदे प्रतिक जाधव मौर्विका ननोरे राहुल घरत निनाद पाटिल राहणार पालघर मुरबाड यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना निसर्गचित्र कसे काढायचे याविषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक श्री. अक्षय शिंदे सर यांनी दाखवले.
दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य देऊन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यात खालील विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले –
प्रथम: यश विलास पेडणेकर द्वितीय: अथर्व अनिल चेंदवणकर तृतीय: हार्दिका सुमंत भरडकर उत्तेजनार्थ: लेखा हरेश मेस्त्री, निशा अनंत पिळणकर
या विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. माणिक पवार यांनी केले व शाळेत सुरू असलेल्या