कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर ऑन फील्ड

कुडाळ शहरातील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

कुडाळ : कुडाळ शहरातील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरत ही काम हाती घेतले आहे.

कुडाळ शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने हाकताना मनस्ताप सहन करावा लागत होता. शिवाय या खड्ड्यांमुळे अपघाता होण्याची शक्यता होती. अनेकदा वाहनांचे चाक या खड्ड्यातून गेल्यास पादचाऱ्यांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडाल्यामुळे पादचाऱ्यांमधून देखील संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे लवकरात लवकर या खड्ड्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत होती.

कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी स्वतः याकडे लक्ष देत शहरातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून वाहनचालकांना मुक्त केले. प्राजक्ता शिरवलकर यांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून वाहनचालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!