मोबाईल कॅन्सर निदान व्हॅन १ ऑगस्ट 2025 रोजी  प्रा. आ. केंद्र पणदूर येथे दाखल

कुडाळ : गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली असून, बऱ्याच वेळी उशिरा निदान झाल्यामुळे कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी व कर्करोगाचे निदान ग्रामीण भागात लवकर होऊन त्वरीत उपचार मिळावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राज्यामध्ये कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे.
या मोहिमेमध्ये कॅन्सर तपासणीची सुविधा असलेली सुसज्ज मोबाईल कॅन्सर निदान व्हॅन आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली असून ,दि. १ ऑगस्ट 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर येथे, सकाळी ९ ते 2 या वेळेत उपलब्ध असणार आहे.
    या व्हॅन मध्ये स्त्रीरोग तज्ञ, दंत शल्यचिकित्सक उपलब्ध होणार असून,मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाच्या  मुखाचा कर्करोग निदान करण्यासाठी तपासणी करण्यात येणार आहे.तरी कुडाळ तालुक्यातील व पणदूर पंचक्रोशीतील सर्व जनतेने  तसेच लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.

कॅन्सर व्हॅन कॅम्प वेळी केल्या जाणाऱ्या तपासणी व सुविधा:


1) गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निदान साठी pap smear व VIA तपासणी
2) मुखाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग निदान करणेसाठी बायोप्सी
3)मोफत रक्त तपासणी
4) रक्तदाब, ब्लडशुगर तपासणी
5) मोफत ई सी जी तपासणी केली जाणार आहे.

टीप-तपासणी साठी येताना नागरिकांनी आधार कार्ड, आभा कार्ड (काढलेले असल्यास), आधार लिंक असलेला मोबाईल घेऊन यायचे आहे

error: Content is protected !!