शेती विकायची नसते जपायची असते — उपसरपंच नवलराज काळे

काळे यांनी शिकवले जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना भात शेतीचे धडे

पर्यटन गाव सडूरे शिराळे हद्दीत विद्या मंदिर सडूरे केंद्र शाळा नंबर एक व विद्या मंदिर चव्हाणवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचा बांधावरची शाळा कार्यक्रम संपन्न

कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा ही सहभाग

वैभववाडी : कृषिप्रधान असलेल्या भारत देशामध्ये प्रगतशील शेतकरी घडवण्याकरिता व नवीन पिढीला शेतीची माहिती मिळावी या हेतूने शासनाकडून बांधावरची शाळा हा उपक्रम राबवला जातो. या पार्श्वभूमीवर ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे(पर्यटन गाव) हद्दीत सडूरे विद्यामंदिर केंद्र शाळा नंबर 1 व विद्यामंदिर चव्हाणवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी बांधावरची शाळा या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. विशेष म्हणजे सांगोळवाडी कृषी कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी देखील या उपक्रमात सहभागी झाले होते.उपसरपंच नवलराज काळे यांच्या शेतावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना उपसरपंच नवलराज काळे यांनी भात शेतीचे धडे शिकवले. यावेळी तरवा काढणे, चिखलणी करणे (आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून) व जुन्या पद्धतीने बैल जोडी व नांगर जोडून नांगरणी करणे), गुठे फिरवणे, चिखलामध्ये खत पेरणी, भात लावणी कशी करणे, अशा अनेक प्रकारच्या बाबींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी उपसरपंच नवलराज काळे यांनी विद्यार्थ्यांना शेती ही विकायची नसते ती टिकवायची असते त्यामुळे प्रत्येकाने भविष्यात शेती करून आपल्या गावाला सुजलम सुफलम करण्याकरिता प्रयत्नशील रहावे असे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आले. व बांधावरती उपस्थित प्राध्यापक व कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चटणी भाकरी व न्याहारीचा अस्वाद घेतला. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे उपसरपंच नवलराज काळे, प्राध्यापक अक्षय देवलकर कृषी महाविद्यालय सांगुळवाडी, प्राध्यापक आकाश साबळे कृषी महाविद्यालय सांगुळवाडी,विद्यामंदिर सडूरे केंद्र शाळा नंबर एकच्या मुख्याध्यापिका सौ अमृता चोथे मॅडम, विद्या मंदिर चव्हाणवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ योगिता येवले मॅडम, दिलीप देवलकर,कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिक रेगे, लंकेश जंगम, कुलदीप रावराणे, सुरेखा काळे,मधुकर हेळेकर(बैल जोडी मालक) व दोन्ही जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

error: Content is protected !!