अटल मॅरेथॉनच्या राष्ट्रीय स्पर्धेत कुडाळ हायस्कूल अव्वल

कुडाळ : 2023-24 च्या अटल मॅरेथॉन या नीती आयोगाने घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत टॉप ४०० मधे कमशिप्र मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे मॉडेल बसले होते. त्याचाच पुढचा भाग म्हणून या टॉप ४०० मधून टॉप १५० मॉडेल शॉर्टलिस्ट केली गेली. त्यामध्ये कुडाळ हायस्कूल चे मॉडेल देशात सर्वप्रथम आले. या टीम मधे विश्वजीत परीट आणि मृदुला देवगडकर या कुडाळ हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि त्यांना अटल इनचार्ज श्री. योगानंद सामंत यांनी मार्गदर्शन केले. नीती आयोगाने श्री. योगानंद सामंत सरांचेही विशेष कौतुक केले आहे. कुडाळ हायस्कूल मधे अटल लॅब स्थापन झाल्यापासून सलग तीन वेळा मॅरेथॉन मधे ही शाळा विजयी झाली आहे. विश्वजीत परीट याने या तीनही स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे हे विशेष.


या स्पर्धेतील स्पर्धक आणि मार्गदर्शक यांचे संस्थेचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट ,सरकार्यवाह अनंत वैद्य , सहकार्यवाह महेंद्र गवस, सीईओ सुरेश चव्हाण , उपाध्यक्ष का आ सामंत तसेच मुख्याध्यापक विपिन वराडे , उपमुख्याध्यापक प्रवीण भोगटे, पर्यवेक्षक रंजन तेली , ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक नारायण साळवी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .

error: Content is protected !!