युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ले सिंधुदुर्गचा समावेश झाल्याबद्दल मा. आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा

      युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ले सिंधुदुर्गचा समावेश करण्यात आला आहे.ही अभिमानास्पद बाब असून त्याबद्दल आज मालवण शिवसेना शाखा येथे कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग किल्ला असलेल्या वायरी भूतनाथ ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच भगवान लुडबे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण कऱण्यात आला. तसेच भगवान लुडबे यांनी सर्वांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जय भवानी, जय शिवाजी!, छत्रपती शिवाजी महाराज की जय! अशा घोषणा देण्यात आल्या.

       यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नंदू गवंडी, गणेश कुडाळकर, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर,दीपक देसाई, बंड्या सरमळकर, मनोज मोंडकर, उमेश मांजरेकर, तेजस लुडबे,उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, श्री लाड,नरेश हुले,  सुरेश माडये आदी शिवसैनिक उपस्थित होते.
error: Content is protected !!