कुडाळ प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील आंब्रड गावचे सरपंच सौ. मानसी कदम यांनी आज महायुतीचे उमेदवार निलेश नारायण राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला, यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, महेंद्र कदम, माजी पंचायत समिती सदस्य अरविंद परब, आंब्रड माजी सरपंच विठ्ठल तेली, विनोद कदम, चंद्रकांत वालावलकर, आदी उपस्थित होते.