देवगडच्या माजी नगराध्यक्ष प्रणाली मानेंसह मुलावर गुन्हा

सावंतवाडीतील प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील सौ. प्रिया पराग चव्हाण या ३३ वर्षीय नवविवाहितेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी देवगडच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान पाणीपुरवठा सभापती प्रणाली मिलिंद माने (४२) व त्यांचा मुलगा आर्य मिलिंद माने या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रणाली माने या नात्याने प्रियाच्या नणंद आहेत. प्रिया हिच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी तिचे वडील, भाऊ, बहिणी आदी नातेवाईकांनी रविवारी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेतली. प्रिया चव्हाण हिच्या आत्महत्येला प्रणाली माने व त्यांचा मुलगा जबाबदार असल्याची तक्रार करत तसा जबाब प्रिया हिचे वडील विलास शंकर तावडे (रा. कलंबिस्त, ता. सावंतवाडी) यांनी नोंदविला. त्यानुसार प्रिया हिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

error: Content is protected !!