पॉवर टिलरवर विद्युत वाहिनी कोसळली

शेतकरी थोडक्यात बचावला

सावंतवाडी : इन्सुली बिलेवाडी येथील शाळेजवळ शेतात काम करत असताना, अचानक चालू विद्युत वाहिनी पॉवर टिलरवर कोसळल्याचा प्रकार घडला. मात्र सुदैवाने स्वतः इलेक्ट्रिशियन असलेल्या शैलेश कोठावळे यांनी प्रसंगावधान राखल्याने ते बचावले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

या घटनेमुळे इन्सुली गावातील जीर्ण झालेल्या वीजवाहक तारा आणि खांबांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांनी यापूर्वीही याबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ग्रामस्थांनी आता प्रशासनाला १५ ऑगस्टपर्यंत जुने कंडक्टर आणि खांब न बदलल्यास, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

error: Content is protected !!