माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा

कुडाळ युवासेनेची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी

कुडाळ : शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुडाळ युवसेनाच्या वतीने कुडाळ पोलिसांकडे करण्यात आली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे हे नपुंसक राजकारणी आहेत असे विधान केले होते. या विधानाचा आज कुडाळ युवासेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, उप विधानसभा प्रमुख चेतन पडते, युवासेना तालुका सचिव साई दळवी, विश्वास पांगुळ, स्वरूप वाळके, लवू कदम, प्रसन्न्न गंगावणे, मुन्ना दळवी, वैभव मेस्त्री, प्रथमेश परब, विनोद सावंत, जागृत परब, भूषण गावडे आदी युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!