विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

वैभववाडी तालुका विकास मंचाचा स्तुत्य शैक्षणिक उपक्रम.

वैभववाडी – वैभववाडी तालुका विकास मंच आयोजित हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम हा भव्य कार्यक्रम वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे, अर्जुन रावराणे विद्यालय, श्री जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय, वैभववाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमात वैभववाडी तालुक्यातील १५ माध्यमिक शाळांतील १२५ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमात वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार श्री सुर्यकांत पाटील, नायब तहसीलदार श्री दिलीप पाटील, वैभववाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील अवसरमोल, तसेच वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, मा. वित्त आणि बांधकाम सभापती सिंधुदुर्ग जिल्हा श्री जयेंद्र रावराणे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. वैभववाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री प्रतिक थोरात, वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ श्रद्धा रावराणे, वैभववाडी नगरपंचायतचे आरोग्य व शिक्षण सभापती श्री रोहन जयेंद्र रावराणे, माजी सभापती श्री लक्ष्मीणराव रावराणे आणि वैभववाडी तालुका पत्रकार संघाचे प्रतिनिधी श्री मारुती कांबळे हे मान्यवर उपस्थित होते.

मा. श्री जयेंद्र रावराणे आणि श्री सदानंद रावराणे, श्री निलेश रावराणे यांनी सदर कार्यक्रमासाठी विनाशुल्क शाळेचा हॉल आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेतर्फे विशेष आभार मानण्यात आले.

तसेच संस्थेतर्फे खालील देणगीदारांचे विशेष आभार मानण्यात आले. श्री सुरेश आडिवरेकर, श्री योगेश यादव, श्री संदीप नारकर, श्री पुंडलिक घाग, श्री निलेश दामोदर रावराणे, श्री विष्णू साळुंखे, श्री विजय श्रीधर जाधव, श्री विजय रावराणे, श्री चंद्रकांत पाटील, श्री चंद्रकांत मुद्रस, श्री लहु साळुंखे, श्री विठ्ठल तळेकर, श्री चंद्रकांत रासम, श्री सुभाष कर्पे, श्री रमाकांत पाष्टे, श्री सदाशिव रावराणे, श्री विश्वनाथ पांचाळ, संतोष पावसकर, श्री धर्मपाल कांबळे, श्री विनायक कोर्लेकर, श्री योगेश आंब्रस्कर, श्री सचिन हरयाण, श्री रविंद्र पाटील, श्री दाजी पाटणकर, श्री एकनाथ पुंडलिक दळवी, शिवकन्या कृष्णाई सुहास फोंडके, श्री संजय जयराम चाचे, श्री अशोक रावराणे, श्री संतोष पवार, श्री रमाकांत जिनगरे, श्री मधुकर सावंत, श्री प्रमोद बाळकृष्ण रावराणे (सडुरे), श्री देवेंद्र राजाराम रासम, श्री अशोक भिकाजी लाड, श्री दशरथ महादेव राशीवटे, श्री अरुण साळुंखे, श्री सुरेश निळकंठ पाटील, श्री रविंद्र यशवंत गावडे, श्री सत्यवान सावळाराम चौधरी तसेच विद्यार्थ्यांसाठी पेन बॉक्स उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आणि सौ पुर्वा प्रफुल्ल साळुंखे यांचे ही विशेष आभार मानण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश भिवाजी पाटील, उपाध्यक्ष श्री विठ्ठल तळेकर, उपाध्यक्ष श्री संतोष पावसकर, सचिव श्री चंद्रकांत रासम, खजिनदार श्री सुभाष करपे, कार्याध्यक्ष श्री विश्वनाथ पांचाळ, कार्याध्यक्ष श्री योगेश आंब्रसकर, कायदेविषयक सल्लागार श्री रमाकांत पाष्टे, कार्यवाह श्री प्रवीण रासम, स्थानिक संपर्क प्रमुख श्री नवलराज काळे तसेच विशेष सल्लागार श्री सुरेश आडिवरेकर, श्री रविंद्र गावडे, श्री विश्वास पावसकर, श्री महेश रावराणे, श्री विशाल घाग, श्री संतोष माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा व्ही एस मरळकर यांनी केले तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक श्री बी एस नादकर यांनी केले. उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना अल्पोपहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!