कोलगाव येथे टेम्पोची दुचाकीला धडक; कुडाळ येथील युवक जखमी

सावंतवाडी : टेम्पोची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक अमित भरत जाधव (वय ३५, रा. कुडाळ) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास कोलगाव-आंधळ्याचा चढाव येथे जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर घडली. यात जखमी झालेल्या जाधव याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्याने दिलेल्या तक्रारीनुसार टेम्पो चालक प्रकाश शंकर दळवी (वय ७५, रा. भटवाडी-सावंतवाडी) याच्यावर येथील पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील जखमी जाधव हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेवून सावंतवाडी ते कुडाळ असा प्रवास करीत होते. यावेळी दळवी यांनी आपल्या ताब्यातील टेम्पो घेवून दुचाकीला डाव्या बाजूने धडक दिली. यात दुचाकीचे नुकसान झाले असून जाधव यांना गंभीर दुखापत झाली आहे. याबाबतची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

error: Content is protected !!