Category वेंगुर्ला

शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे शिरोडकर कुटुंबीयांची तक्रार अखेर दाखल

गुजराती व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हा वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावडेवाडी येथील शिरोडकर कुटुंबीयांना त्यांच्या जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीची तक्रार अखेर वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली असतानाही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नव्हती, मात्र शिवसेना (उद्धव…

दाभोलीत दिवसाढवळ्या स्थानिक ग्रामस्थांना परप्रांतियांकडून मारहाण होऊनही गुन्हे दाखल नाहीत

स्थानिकांवर अन्याय करणाऱ्या वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची चौकशी करून बदली करा माजी आमदार वैभव नाईक,परशुराम उपरकर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

सागरेश्वर समुद्रकिनारी आढळला वृद्धाचा मृतदेह

आकस्मिक मृत्यूची नोंद वेंगुर्ले : तालुक्यातील सागरेश्वर समुद्रकिनारी ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उभादांडा, सिद्धेश्वरवाडी येथील राँकी डियोग फर्नांडिस, वय ६० वर्षे हे शुक्रवारी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी समुद्र किनारी…

३२ वर्षीय तरुणाचा खाडीत बुडून मृत्यू

सांज्युआंव सणानिमित्त आंघोळीसाठी उतरला असता घडली दुर्घटना वेंगुर्ले : तालुक्यातील टाक न्हयचीआड येथील जुबाव उर्फ जॉनी सालु फर्नांडिस वय ३२ वर्ष हा आंघोळीसाठी न्हयचीआड येथील खाडीच्या पाण्यात उतरला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. ‘सांज्युआंव’ सणानिमित्त आंघोळीसाठी उतरला असताना ही दुर्घटना…

वेंगुर्ला – उभादांडा येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

उभादांडा-कांबळीवाडी येथील रहिवासी संतोष विष्णू हरमलकर (५३) याचा मृतदेह, रहाते घरांत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत व कुजलेल्या परीस्थितीत आढळून आला. याबाबत वेंगुर्ले पोलीसांत अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. उभादांडा-कांबळीवाडी येथील रहिवासी संतोष विष्णू हरमलकर (५३) हे दि १९ जून…

वेंगुर्लेत तब्बल ६० लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

वेंगुर्ले : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील मठ चेकपोस्ट वर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 20 लाख रुपये किमतीच्या आयशर टेम्पो व 50 लाख 90 हजार रुपये किमतीच्या गोवा…

निवती मेढा येथे सापडला तब्बल १२ फुटी अजगर

वेंगुर्ला : तालुक्यातील निवती मेढा येथिल ग्रामपंचायत आवारात बारा फुटी अजगर आढळून आला हा अजगर ग्रामपंचायत च्या बाजूला अडगळीच्या ठिकाणी दिसून आला याची खबर ग्रामस्थांनी निवती गावचे सरपंच श्री. अवधुत रेगे यांना दूरध्वनीद्वारे दिली. सरपंच अवधूत रेगे हे बाहेरगावी होते…

दाभोली येथे रस्त्यावर कोसळली दरड

सुदैवाने वाहतूक नसल्याने अनर्थ टळला वेंगुर्लेः रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले मालवण सागरी महामार्गावरील दाभोली येथे फॅक्टरी जवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळली आहे. सुदैवाने यावेळी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळ पर्यंत ठप्प…

खा. नारायण राणे यांनी केले मनीष दळवी व कुटुंबीयांचे सांत्वन

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी ७ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी मनिष दळवी यांची होडावडा येथील निवासस्थानी…

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना पितृशोक

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांचे वडिल होडावडा सोसायटीचे माजी चेअरमन, आंबा बागायतदार, पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. प्रकाश सेनापती दळवी वय ७५ यांचे शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास बांबुळी गोवा येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या…

error: Content is protected !!