कणकवली : कणकवली शहरातील नेहमीच वादात अडकलेल्या आणि चर्चेत राहिलेल्या फ्लाय ओव्हर ब्रिजच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील स्टेट बँकेसमोरील पिलर क्रमांक 3 च्या ठिकाणी पिलरच्या जॉईंट असलेल्या रस्त्याच्या पृष्ठभागाच्या खालील सर्विस रस्त्याच्या बाजूस फ्लाय ओव्हर ब्रिजच्या काँक्रीटच्या काही भागाला मोठा तडा गेल्याची घटना समोर आली आहे. तसेच साधारण तीन ते चार फुटाचा एक काँक्रीटचा तुकडा देखील निघालेल्या स्थितीत दिसून येत असून तो सर्विस रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी किंवा वाहनांवर कोसळण्याची देखील भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे या पुलाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेमुळे व यापूर्वी याच पुलाच्या संदर्भात घडलेल्या घटनांमुळे हा पूल खरोखरच वाहतुकीस योग्य आहे का? या पुलावरून वाहतूक करणे सुरक्षित आहे का? तसेच पुलाखालून देखील वाहतूक किंवा रहदारी कोणाच्या जीवावर बेतणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. गेल्या दोन दिवसापासून ही बाब प्रकर्षाने निदर्शनास येत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये देखील या घटनेमुळे चर्चा सुरू असून भीतीचे वातावरण पसरले आहे. कणकवली शहरातील बॉक्सेल ब्रिजचा काही भाग यापूर्वी कोसळला होता. त्यानंतर झालेले आंदोलन व घडलेल्या घटना यांनी कणकवलीतील फ्लाय ओव्हर व बॉक्सेल ब्रिज हे राज्यभरात चर्चेत आले होते. याच बॉक्सेल ब्रिजचा एसएम हायस्कूल जवळचा एक भाग खचल्याने तर दुसऱ्या बाजूचा काही भाग कोसळल्याने गेली तीन वर्षे ब्रिजवर या कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी आजही बॅरिकेट लावलेली असतात. परंतु याबाबत कोणताही ठोस निर्णय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून घेण्यात आलेला नाही. साहजिक महामार्ग प्राधिकरण ला हे पुल खचण्याची दुर्घटना घडणार नाही? याची शाश्वती नसल्याचेही यावरून दिसून येत असल्याची चर्चा जनतेमध्ये आहे. दरम्यान कणकवलीत पिलर क्रमांक तीन हा स्टेट बँके समोर येत असून या पिलरवर फ्लाय ओव्हर ब्रिजचे वरील काँक्रीटचे दोन्ही भाग ज्या ठिकाणी एकत्रित होतात त्यापासून रस्त्याची ब्रिजवरची संरक्षण भिंतीपर्यंतच्या पुलाच्या खालील भागाला पूर्णतः भेग गेल्याचे दिसत आहे. दरम्यान त्या ठिकाणी काँक्रीटचा काही भाग भविष्यात कोसळू शकतो अशाही स्थितीत असल्याचे दिसत आहे. परंतु याबाबत महामार्ग प्राधिकरण किंवा जबाबदार प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. या संपूर्ण प्रकाराबाबत महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, शनिवारी सदर जागेची पाहणी केली असून येत्या दोन दिवसांमध्ये या ठिकाणच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी तंत्रज्ञांची टीम घटनास्थळी येणार आहे. त्यानंतर याबाबत पुढील काय उपाययोजना कराव्या लागतील किंवा या संदर्भात धोका आहे किंवा कसे हे स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु एकूणच कणकवलीत यापूर्वी फ्लाय ओव्हर ब्रिजच्या अनुषंगाने घडलेल्या घटनांचा विचार करता महामार्ग प्राधिकरण याबाबत ठोस निर्णय घेणार का? तसेच फ्लाय ओव्हर ब्रिजवर आजही तीन वर्षानंतर लावलेली बॅरिकेट हटवून महामार्गचा फ्लायओव्हर ब्रिजवरील भाग वाहतुकीस निर्धोक करणार का? असाही सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.

नेहमीच वादात अडकलेल्या कणकवली फ्लाय ओव्हर ब्रिजच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105

Subscribe










