कुडाळ : घावनळे गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य दिनेश वारंग यांचा वाढदिवस आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी १०वी, १२वी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार तसेच महिला बचत गट व शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, दादा साईल, दिनेश वारंग, दिपलक्ष्मी पडते, वर्षा कुडाळकर, सरपंच आरती वारंग, दीपक पाटकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.