रत्नागिरी : आज झालेल्या मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला असून वेरवली – विलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळली आहे. आज संध्याकाळी ६.३० वाजता ही दरड कोसळली असून रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून आहेत. दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून मुसळधार पावसामुळे दरड हटवण्याचे कामात अडचणी येत होत्या. तब्बल दीड ते दोन तासानंतर वाहतूक सुरू झाली असून गाड्या उशिराने धावत आहेत.