केळुस गावात बिबट्याकडून बैलाचा फडशा

केळूसगावात वाघाचा मुक्त संचार एका पाच वर्षाच्या बच्छड्या बैलाचा घेतला बळी, घटनेची खबर लागताच पोलिस पाटील तसेच गावचे सरपंच यांनी घटनास्थळी धाव घेतली व वनविभाग अधिकारी निवती पोलिस यांना घडलेल्या घटनेची खबर दिली सदर बिबट्या वाघचे केळूस, मुणगी; आंदुर्ले गावातील परीसरात मुक्त संचार चालू असल्याने गावात भितीचे वातावरण आहे. वाघाला पकडण्याची ग्रामस्थांची मागणी केली असून सदर घटना या वर्षात दुसरी आहे.

या पुर्वी याच भागात एका गाईवर या वाघाने हल्ला करून तीचा जीव घेतला होता.. तशाच पद्दतीची ही दुसरी घटना घडली आहे.

केळूस बापाडतेवाडी येथील शंकर आजगावकर यांच्या घराच्या बाजूला बांधलेल्या ५ वर्षे वयाच्या बैलावर बिबट्या जातीच्या वाघाने हल्ला करुन ठार केले आहे त्या मुळे त्यांचे आर्थीकही नुकसान झाले आहे अशा घटना गावात घडत असताना वन विभाग मात्र चिडीचूप आहे त्या मुळे सदर वाघाला वन विभागाने पिंजरा लावून पकडण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

पटेरी वाघाचे दर्शन.

गावातील काही ग्रामस्थांच्या मते गावातील काही ठराविक परीसरात पट्टेरी वाघ पाहण्यात आढळल्याचे मत मांडले आहे या संदर्भात केळूस गावचे विद्यमान सरपंच योगेश शेट्ये यांना विचारले असता पट्टेरी वाघ आजवर काही या भागात आढळून आलेला नाही.. पण बिबट्या वाघांचे दर्शन मात्र बरेचदा ग्रामस्थांना घडत आले आहे तरी पट्टेरी वाघाचे या भागात जर काही ग्रामस्थांना दर्शन घडले असेल ते मी नाकारतही नाही.. तरी माझे गावातील ग्रामस्थांना येवढेच आवाहन आहे वाघाच्या भितीने भयभित कोणीही न होती आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. सदर बाब वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून त्यावर तोडगा काढला जाईल असे विद्यमान सरपंचांनी सांगितले.

error: Content is protected !!