कणकवली : सोमवार दिनांक ५ मे २०२५ रोजी कणकवली येथे विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने चा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी मेडिकल डायरेक्टर डॉ. नेमीनाथ खोत,जनरल सर्जन डॉ. विदयाधर तायशेटे, रेटीना सर्जन डॉ. प्रवीण हंकारे, बाल नेत्रौपचार तज्ञ डॉ. मिताली शहा, फेको सर्जन डॉ. साकेत कुलकर्णी व डॉ किमया वानखेडे, विवेकानंद नेत्रालयाच्या व्यवस्थापिका पूनम जगदाळे आदी उपस्थित होते.
याठिकाणी अल्प दरात फेको पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच आश्रमामधील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया तसेच पांढरे, पिवळे, केसरी रेशनकार्ड धारकांना महात्मा फुले योजनेंतर्गत सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
एवढ्या अत्याधुनिक सुविधा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयात उपलब्ध झाल्यामुळे जिल्हवासियांना याचा फायदा होणार आहे.