महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन सिंधुदुर्ग येथे धरणे आंदोलन…

बँक मित्र व बँकिंग करस्पॉन्टेंट यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींना वाचा फोडण्यासाठी व आपल्या विविध मागण्या घेऊन आज दिनांक 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस जवळ धरणे आंदोलन वर बसले.


खेडोपाडी बँकिंग व्यवस्था पुरवण्याचे काम बँक मित्र मार्फत केले जाते, परंतु या कामी मिळणारे कमिशन अगदी शुल्लक आहे. सदर कमिशन मधून घर खर्चही निघत नसून बँकिंग ची सेवा मात्र पुरवण्याचे उद्दिष्ट यांना दिले जाते.


यांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत


(१) बँक मित्रांना निर्धारित सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात.

(२) बँक आणि बँक मित्र यातील मध्यस्थ यांना दूर सारले जावे.

(३) बँक मित्रांना किमान मेहनताना दिला जावा ज्यासाठी त्यांच्या कडून किमान निर्धारित काम करून घेतले जावे व व्यवहारासाठी योग्य त्या दराने कमिशन दिले जावे.यात निर्धारित काळानंतर योग्य ती वाढ करण्यात यावी.
(४) बँक मित्रांच्या नेमणुका भौगोलिक सिमा खात्यांची संख्या व्यवहार या निकषांवर केल्या जाव्यात.
(५) बँक मित्र देत असलेल्या सेवांसाठी जागा वापरत असलेला डाटा स्टेशनरी वाहन खर्च याची भरपाई देण्यात यावी.(६) बँक मित्र करत असलेले कार्यालयीन कामकाज यात कायदेशीर किंवा अर्थ कायदेशीर (QUASI LEGAL ) विवाद निर्माण झाले तर त्याचा निपटारा करण्याची जबाबदारी बँकेने घ्यावी.
(७) बँक मित्र ते करत असलेल्या कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून पैशांची ने आण करतात.यातील जोखीम लक्षात घेता त्या रकमेचा विमा काढला जावा.यात अपघात अथवा मृत्यू आला तर त्याचाही विमा काढला जावा.
(८) बँक मित्रांना प्रोव्हिडेंट फंड ग्रॅच्युइटी पेन्शन या सामाजिक सुरक्षितता योजना लागू करण्यात याव्यात.


(९) बँक मित्रांना आर्दश आचार संहिता लागू करण्यात यावी.

(१०) बँक मित्र सखी म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना बाळंतपणाची रजा इस्पितळाचा खर्च देण्यात यावा.

(११) बँक मित्रांना स्वस्त व्याजदराने व्यवसाय विकसित करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे.


अशा विविध मागण्या घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बँक मित्र व बँकिंग करस्पॉन्डेंट धरणे आंदोलनात बसले होते.
सदर आंदोलन हे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉम. देविदास तुळजापूरकर अध्यक्ष
दिपक पाटील जनरल सेक्रेटरी यांनी केले.
सदर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइस फेडरेशनचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समन्वयक कॉम. निखिल साटम व बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइस युनियन चे धिरेश काणेकर उपस्थित होते.
या धरणे आंदोलनाचे नियोजन जिल्हा चेअरमन योगेश बागवे, को कन्व्हेनर हर्षद ढेकणे, रिजवान धोपावकर, गजानन बांबूळकर यांनी केले.
या वेळी पाडुरंग कदम,निलेश इंदोलीकर , प्रथमेश कुबडे ,दर्पण आचरेकर ,दिपाली घाडी,वैभव तळवडेकर,संजय नाईकधुरे,आनंदिता प्रभू, साजिरी मोरे , रविना धुरी, मंगल कुबडे इत्यादी मोठ्या संख्येने बँक मित्र सहकारी मंडळी धरणे आंदोलनात सहभागी होते.

error: Content is protected !!