युवतीला इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी एकाला अटक

इंस्टाग्रामवर या शोषल मीडियावरील प्लॅटफॉर्म माध्यमातून युवतीला अश्लील मेसेज पाठवून तिला मानसीक त्रास दिल्या प्रकरणी आरोंदा येथील इसमास सावंतवाडी पोलिसांनी केली अटकेची कारवाई केली आहे. सदर ईसमाचे शिवा गोविंद कोळंबकर (वय ३५, रा. शिपेतुवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

संशयिताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे एका युवतीला अश्लील एसएमएस पाठवले होते. याबाबतची तक्रार त्या युवतीने सायबर सेलकडे केली होती. त्यानुसार त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर आपण तो नव्हेच, असा पवित्रा घेत माझ्या नावाचे सिम कार्ड अन्य कोणीतरी काढले असून त्याने हा प्रकार केला असावा, असा बनाव रचला त्यामुळे पोलीसही चक्रावले होते. त्यानंतर गेले दोन महिने या प्रकरणाचा तपास सुरू होता. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने या प्रकाराच्या मुळाशी जाऊन गा गुन्ह्याचा तपास लावला. यात कोळंबकर याचे नाव उघड झाले.

error: Content is protected !!