युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय,भारत सरकार द्वारा घेण्यात येणारी ७ वी खेलो इंडिया युथ गेम्स 2025 कबड्डी स्पर्धा 4 मे ते 10 मे या कालावधीमध्ये राजगीर,बिहार येथे होणार आहे.सदर स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून 28 सामनाधिकारी यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र राष्ट्रीय कबड्डी पंच श्री प्रितम वालावलकर या एकमेव पंचांची निवड झालेली आहे.
प्रितम वालावलकर हे वालावल गावचे रहिवाशी असून श्री लक्ष्मीनारायण वालावल कबड्डी संघाचे माजी कर्णधार तथा खेळाडू राहिले आहेत.ते अखिल भारतीय स्तरावरील राष्ट्रीय पंच परीक्षा पास असून व याआधी त्यांनी अनेक मोठ्या जिल्हा,राज्य व राष्ट्रीय पातळीवर व्यावसायिक कबड्डी स्पर्धांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हुशार ,अभ्यासू आणि स्टायलिश पंच म्हणून त्यांची ओळख असून या सर्व गोष्टींचा विचार करूनच त्यांची या राष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठ्या कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे.
खेलो इंडिया युथ गेम्स साठी निवड होणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ते पहिले व एकमेव पंच असून महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मा.श्री नितेशजी राणे तसेच कुडाळ मालवण मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सन्मा.श्री निलेशजी राणे यांनी या गोष्टीची दखल घेत अभिनंदन व शुभेच्छा देत सिंधुदुर्ग साठी ही अभिमानाची गोष्ट असून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या निवडीसाठी संपूर्ण महाराष्ट्र व सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून अनेक स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.या आतापर्यंतच्या कबड्डी प्रवासामध्ये वालावल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक गुरुवर्य श्री संतोष गोसावी व गुरुवर्य श्री राजेश सिंगनाथ सर यांचे विशेष सहकार्य लाभत आलेले आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










