आ.वैभव नाईक हेच या भागाचा विकास करू शकत असल्याने आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्विकारल्याची प्रतिक्रिया.
आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन केले त्यांचे पक्षात स्वागत
मालवण : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील आचरा-हिर्लेवाडी गावामधील युवकांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे.आचरा गावाचा विकास आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला असल्याचे प्रवेश कर्त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले आ.वैभव नाईक यांनी अनेक विकासात्मक व समाजोपयोगी कामे केली आहेत.आ.वैभव नाईक हेच या भागाचा विकास करू शकत असल्याने आ.वैभव नाईक यांचे नेतृत्व स्विकारले असून ते सर्वसामान्यांमध्ये वावरून सर्वसामान्यांच्या वेळे प्रसंगाला धावून जाणारे आमदार आहेत यामुळेच आपण त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन शिवसेना पक्षाची मशाल हाती घेतली आहे येणाऱ्या काळात शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी आपण जोमाने काम करू असेही त्यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास येथील युवकांनी दाखवला.त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत आचरा गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांना दिला आहे.
यावेळी दर्पण आचरेकर,धनंजय आचरेकर,मंथन मुणगेकर,अनिकेत पेडणेकर,राजा वायंगणकर,मंदार केरकर,दर्शन मुणगेकर व इतर प्रमुख युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
याप्रसंगी शिवसेना आचरा विभाग समन्वयक मंगेश टेमकर,उपविभाग समन्वयक पप्पू परुळेकर आचरा शहरप्रमुख छोटू पांगे,युवासेना शाखा संघटक रूपम टेमकर आदी शिवसैनिक उपस्थित होते .