कुपवडे गावचे मानकरी व कट्टर राणे समर्थक सुधाकर परब यांनी हाती घेतली मशाल

शेतकऱ्यांच्या वेळे प्रसंगाला धावून येणारे आमदार म्हणून वैभव नाईकच हवेत- प्रवेशकर्त्यांची प्रतिक्रिया

कुडाळ – मालवण मतदारसंघात भाजपा ला जोरदार धक्के

कुडाळ : निवडणूकीचे वारे बघून पक्ष बदलनारे निलेश राणे नको म्हणून व त्यांच्या अधिपत्याखाली काम करण्यास आणि त्यांच्या वागणुकीला कंटाळून कुडाळ तालुक्यातील कुपवडे गावचे मानकरी आणि कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्ते सुधाकर परब यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली विजय भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली.आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

निलेश राणे यांना जरी महायुतीने उमेदवारी दिली असली तरी पदाधिकारी कार्यकर्ते मात्र त्यांना स्वीकारण्यास तयार नाहीत.त्यामुळे अनेक कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेत आहेत.निलेश राणेंच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनादेखील पदावरून हटविण्यात आले त्यावरून देखील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले आ.वैभव नाईक यांनी कुपवडे गावात ३ कोटी रुपयाचा रस्ता,अनेक पायवाटा,पुल,सभामंडळ अशी अनेक कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लावली आहेत. याउलट निलेश राणे केवळ निवडणूकीच्या तोंडावर पैसे वाटपाचे काम करतात मात्र आपल्याला अर्ध्या रात्री वेळेप्रसंगाला धावून येणारे आमदार वैभव नाईकच हवेत असे यावेळी त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

यावेळी उपतालुकाप्रमुख महेश सावंत,उपविभाग प्रमुख,पी.डी सावंत, माजी उपसरपंच विजय परब,सदाशिव परब,श्रीकांत परब, रवींद्र परब,रमेश परब,अरुण परब, आदी शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *