माणगाव खोऱ्यात BSNL चा लपंडाव, व्यवस्थित सेवा द्या अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू – योगेश धुरी,

माणगांव खोऱ्यात गेले कित्येक दिवस BSNL ची रेंज नाही, वेळोवेळी निवेदन दिली मात्र अधिकारी लक्षच देत नाहीत. माणगाव खोरे हा माणगाव ते शिवापूर पर्यंत अतिशय ग्रामीण भाग या भागात BSNL च्या सेवे शिवाय अन्य पर्याय नाही.


माजी खासदार माजी आमदार यांच्या माध्यमातून माणगाव खोऱ्यात अनेक ठिकाणी BSNL चे टॉवर उभे करण्यात आले मात्र राजकीय श्रेय वाद अजूनही आहेत तसेच आहेत माणगाव खोऱ्याचा विकास मात्र ठप्प झालाय असं वाटायला लागलय.


गेले कित्येक दिवस BSNL ची रेंज गायब आहे काहीवेळा येते आणि लगेच जाते,ग्रामीण भागातील व्यवस्था पूर्णपणे BSNL वर अवलंबून आहे असं असून BSNL चे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करता आहेत.


BSNL च्या मुजोर अधिकाऱ्यांची मस्ती खपून घेणार नाहीं.
दोन दिवसात जे काही असेल ते दुरुस्त करा आणि सेवा द्या अन्यथा BSNL च्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी दिला आहे.

error: Content is protected !!