जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2025 चे आयोजन

गुंतवणूक परिषदेस उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

जिल्हाधिकारी अनिल पाटील

        सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग व्यवसायास पूरक वातावरण असून पायाभूत सोयी सुविधा, कुशल मनुष्यबळाची मोठी उपलब्धता आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरण पुरक आणि कृषि आधारित जास्तीत जास्त उद्योग आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर 30 एप्रिल रोजी गुंतवणूकदारांची परिषद होणार आहे. या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून या परिषदेस अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.

        जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, श्री पत्की उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की सन २०२४ मध्ये जिल्हा गुंतवणूक परिषद मध्ये ४४६.७४ कोटी रूपयांचे एकूण ९१ सामंजस्य करार झाले असून त्याद्वारे १८६७ रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. या कराराची सद्यस्थिती पहाता ४ प्रस्ताव (१२.७७ कोटी रुपये ) रद्द करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. १४ प्रस्ताव मध्ये जागेचा ताबा मिळवला असून ९ प्रस्ताव विविध मंजुरी मिळणे साठीचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. उर्वरित ६४ प्रस्ताव १९१.२९ कोटी गुंतवणूक १३९६ रोजगार निर्मितीचे कार्यरत झाले आहेत. सन २०२५ मधील कोंकण विभागीय गुंतवणूक परिषद १२ मार्च रोजी ठाणे येथे झाली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३ सामंजस्य करार ( रुपये ३८२.९१ कोटीं) झाले असून त्याद्वारे ८७२ रोजगार निर्मिती झाले. प्रस्तावित परिषदे मध्ये आणखी ३० सामंजस्य करार होणार असून त्यामध्ये एकूण २५३.०२ कोटी गुंतवणूक व ८४० रोजगार निर्मिती होणार आहे. सदर वर्षीं एकूण ७३ सामंजस्य करार ६३५.९३ कोटी व १७१२ रोजगार निर्मिती होणार आहे. या शिवाय आणखी येऊ शकणाऱ्यां गुंतवणूकीचे स्वागत असून ती यादीत समाविष्ट करण्यात येतील असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!