त्या अनधिकृत मदरशात आढळली अवैध शस्त्रे

दोडामार्ग : साटेली भेडशी येथील थोरले भरड या ठिकाणी काल रविवारी अनधिकृत मदरसा असल्याचे हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांना कळाले. या ठिकाणी पाहणी केली असता सदर घराची परवानगी घेऊन त्यात धर्म प्रशिक्षण दिले जाते तसेच अवैध शस्त्रे आढळल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. याबाबत हिंदू संघटनेचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ आक्रमक झाले असून संशयीताच्या विरोधात कारवाई करा असे म्हणत त्यांनी सदर मदरश्याला समोरच ठिय्या आंदोलन पुकारले. यानंतर संशयीतांपैकी दोघांना प्रति पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच मिळालेले अवैध शस्त्र ही पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली. सदर अटक केलेल्या व्यक्तीमध्ये एक स्थानिक तर दुसरा बिहार येथील असल्याचे कळते.

यावर सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक वर्षापासून दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी गावात थोरले भरड येथे तेथील एका मुस्लिमांकडून घराच्या बांधकामाची परवानगी घेऊन त्यात अनधिकृतरित्या मदरसा चालत असल्याचे हिंदू बांधवांची तक्रार होती, मात्र हे धन दाडंगे लोक आपल्या पैशाच्या जोरावर यंत्रणेला हाताशी धरून हा मदरसा चालवत होते. यात एक बिहार येथील मुस्लिम धर्मगुरू प्रशिक्षण देत होता. मात्र रविवारी बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संस्था तसेच स्थानिक ग्रामस्थ, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सरपंच देवेंद्र शेटकर, साटेली भेडशी सरपंच छाया धर्णे, बजरंग दलाचे निळकंठ फाटक यांसह अनेक हिंदू बांधव यांनी या ठिकाणी जात हा मदरसा बंद करावा यासाठी ठिय्या आंदोलन केले यावेळी घरमालक तसेच ज्या संस्थेच्या माध्यमातून हे अनधिकृत काम चालते त्याचा प्रमुख हा कोणीच न आल्याने परिस्थिती आक्रमक बनत गेली, साधारण दुपारी दीड वाजता सुरू झालेल्या ठिय्या संध्याकाळ पर्यंत सुरूच होता यावेळी सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण गवस, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, चेतन चव्हाण यांचा रुद्र अवतार याप्रसंगी पहावयास मिळाला.

अन् शस्त्रास्त्रे मिळाली… स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदू संघटनेचे पदाधिकारी यांचा रुद्रावतार पाहताच उशिरा संध्याकाळी घरमालक व धर्मगुरू यांना घर तपासणीसाठी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग पोलीस घेऊन आले, त्यानंतर या घराची झडती घेतली असता त्यामध्ये दोन अवैध तलवारी असल्याचे निष्पन्न झाले, यावेळी हिंदू बांधव यांनी या दोघांवर आक्रमक कारवाई करा आणि सदर मदरसा बंद करा असे आवाहन हिंदू बांधवांकडून करण्यात आले. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून घरमालक तसेच या ठिकाणी प्रशिक्षण देणारा परप्रांतीय धर्मगुरू यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

अन रस्ता झाला खुला.. या मदरशाला अधिकृत मान्यता द्या आपण तुम्हाला रस्ता देतो अशी अट ठेवत वहिवाटीचा असलेला गेल्या अनेक वर्षाचा रस्ता सदर घर वजा मदरश्याच्या मालकाने बंद केला होता. आजच्या या ठिकाणी हिंदू बांधवांची होत असलेली ओढा ताण पाहता हिंदू संघटनांनी पुढे सरसावत सदरचा रस्ता खुला केला. यावेळी या दोघांनीही प्रत्येकी दोन दोन मीटर याप्रमाणे चार मीटर रस्ता देण्याचे मान्य केले होते. हाच धागा पकडत व कागदपत्रे सादर करत आहा रस्ता आम्हाला कायमस्वरूपी मिळावा अशी मागणी ही इथल्या महिलांनी केली. रस्ता खुला झाल्यामुळे त्यांनीही आनंद व्यक्त केला.

error: Content is protected !!