मोदी-शहा, सरकार पाडण्यात,पक्ष फोडण्यात व्यस्त,देशातील नागरिकांना सुरक्षा देण्यात मात्र अपयशी
वैभव नाईक, जीजी उपरकर, सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांचा घणाघात
        जम्मू -काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज कणकवली पटवर्धन चौकात तीव्र स्वरूपात निषेध केला. यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून तो जाळण्यात आला. यावेळी मुडदाबाद, मुडदाबाद  पाकिस्तान मुडदाबाद! एक-दो, एक-दो पाकिस्तान को फेकदो, केंद्र सरकार हाय हाय! अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी हाताला काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध नोंदविला तसेच या अतिरेकी हल्यात मृत पावलेल्या नागरिकांसाठी दोन मिनिट स्तब्ध उभे राहत श्रद्धांजली वाहण्यात आली. 
          केंद्र सरकार देशातील नागरिकांना सुरक्षा देण्यात कमी पडल्याने निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मोदी आणि शहा हे गेली १० वर्षे सरकार पाडणे आणि  पक्ष फोडण्यात व्यस्त असल्याने देशातील सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. दहशतवादी देशात घुसून नागरिकांना गोळ्या घालत आहेत हे केंद्र सरकारचे अपयश आहे. या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक लोक अडकले आहेत त्यांना मागे येण्यासाठी सुविधा नाहीत मात्र महाराष्ट्रातील काही नेते काश्मीर मध्ये जाऊन फोटोसेशन करत आहेत त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो अशा शब्दात माजी आमदार वैभव नाईक, जीजी उपरकर, सतीश सावंत, संदेश पारकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 
        यावेळी कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर,तालुका संघटक राजू राठोड, शहरप्रमूख रुपेश नार्वेकर,राजू शेटये,महेश कोदे,बंडू चव्हाण,अनुप वारंग,माधवी दळवी,संजना कोलते,दिव्या साळगावकर, धनश्री मेस्त्री,प्रतिभा अवसरे, अजय सावंत,योगेश मुंज,अजित काणेकर,वैभव मालंडकर, संतोष पुजारे,रोहित राणे,नितीन राऊळ,अरुण परब,रामा राणे,लक्ष्मण हन्नीकोड, बाबू केणी,रवी परब,उद्धव पारकर,सार्थक ठाकूर आदिंसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.1
 / 
67


उद्या वैभव नाईक जरी पक्षात येत असतील तरी त्यांचे स्वागत करा #nileshrane #vaibhavnaik #rajanteli

बीजेपीमध्ये जे आहेत ते सगळे माझेच सहकारी आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #deepakkesarkar

निलेश राणे उभे आहेत ना १०० % मी निवडून येणार Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik #sindhudurg

कापा म्हणजे ? मर्डर करा ? एवढं सोपं आहे का ? निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #sindhudurg #kudal

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी  ACB कटिबद्ध #sindhudurg #acb

तुझ्या औकातीत रहा संजू परब यांचा विशाल परबांना थेट इशारा #sawantawadi #vishalparab #sanjuparab

खोटया गुन्हयात अडकवले वकीलांचा पोलिसांवर आरोप #sindhudurg #kudal #breakingnews

रणझुंजार मित्रमंडळ नेरूर व रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य नरकासुर स्पर्धा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचा जिल्हाध्यक्ष असेल #sindhudurg #kudal

तेर्से बांबर्डे मळावाडी येथील ब्रिजचे काम शंभर टक्के पूर्ण करणार- निलेश राणे Nilesh Rane #nileshrane

कोणी कोणाला काढलं तेच समजत नाही ! #rajthackeray

वाडी - वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे देणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा
1
 / 
67

 
	

 Subscribe
Subscribe









