व्हॉईस ऑफ मीडिया’च्या रेट्यापुढे सरकार नमले..!

पत्रकारांसाठी मंत्रालय प्रवेशासाठी सरकारने काढलेला आदेश घेतला तातडीने मागे

मुंबई : महाराष्ट्र सरकारने २ वाजेच्या नंतर पत्रकारांना मंत्रालयात प्रवेश देण्यासंदर्भात एक आदेश जारी केला होता. या आदेशामुळे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेने सरकारकडून आदेश मागे घेण्याचा इशारा दिला होता. “व्हॉईस ऑफ मीडिया”च्या दबावामुळे सरकारने काढलेला आदेश मागे घेतला.


“व्हॉईस ऑफ मीडियाचे” संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सरकारच्या वर्तनावर गंभीर टीका केली होता. “व्हॉईस ऑफ मीडिया” ने सरकारच्या या आदेशाचा तीव्र विरोध केला. जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, पत्रकारांना मंत्रालयातील कामकाजात २ वाजेनंतर प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले होते. या आदेशामुळे पत्रकारांच्या स्वातंत्र्याची अडचण झाली होती. संदीप काळे यांनी पत्रकारांचे स्वातंत्र्य आणि त्यांच्या कामाची प्रतिष्ठा अबाधित राहावी, यासाठी सरकारकडे तातडीने निर्णय बदलण्याची मागणी केली होती. हा निर्णय मागे घ्यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. संदीप काळे यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितले होते की, हा आदेश मागे घेण्यात आला नाही, तर मोठे आंदोलन सुरू केले जाईल. पत्रकारांचे स्वातंत्र्य आणि त्यांचे अधिकार हे अतिशय महत्वाचे आहेत.


“आम्ही कोणत्याही प्रकारे पत्रकारांच्या हक्कांवर गदा येऊ देवू शकत नाही.
सरकारने हा आदेश मागे घेऊन पत्रकारांचा सन्मान केला आहे. या निर्णया नंतर आमचे आंदोलन यशस्वी झाले आहे,” असे संदीप काळे यांनी सांगितले.


“व्हॉईस ऑफ मीडिया” ने ही स्पष्ट केली की, सरकारच्या या निर्णयामुळे पत्रकारांचा स्वातंत्र्य हक्क अबाधित राहिलेल्या आहेत. तथापि, “व्हॉईस ऑफ मीडिया” च्या वतीने हा संघर्ष येथे थांबलेला नाही. आगामी काळात जर सरकारने पत्रकारांच्या स्वातंत्र्याबाबत आणखी कुठल्या प्रकारची अडचण आणली, तर “व्हॉईस ऑफ मीडिया” च्या वतीने आणखी मोठे आंदोलन आयोजित केले जाईल.


“आमचे काम हे केवळ पत्रकारांच्या हक्कांची रक्षा करण्याचे नाही, तर त्याचसोबत त्यांच्या कामाच्या स्वातंत्र्याचे समर्थन करणे आहे. आम्ही नेहमीच पत्रकारांची बाजू घेऊन लढत राहू.”
सरकारने पत्रकारांसाठी मंत्रालय प्रवेशाबाबत घेतलेला निर्णय मागे घेतल्याने, राज्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे पत्रकारांचे कार्य सुरळीतपणे चालू राहील आणि सरकारच्या कडून त्यांचा सन्मान होत राहील, असे “व्हॉईस ऑफ मीडिया” च्या वतीने सांगितले.


“व्हॉईस ऑफ मीडिया”चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी यावर प्रतिक्रिया देताना, “सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आमच्या कार्याची प्रतिष्ठा आणि आमचा स्वतंत्रपणा कायम राहिला आहे. आम्ही ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या नेतृत्वाखालील या लढ्याचे स्वागत करतो,” असे सांगितले.


“व्हॉईस ऑफ मीडिया” च्या वतीने अजून काही मुद्द्यांवर आंदोलन करण्याची योजना आहे. प्रदेश सरचिटणीस दिगंबर महाले यांनी स्पष्ट केले की, जर सरकारकडून पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर कशा प्रकारेही गदा आणली गेली, तर त्यांचा संघटनेचा लढा पुढेही जारी राहील. पत्रकारांच्या स्वतंत्रतेचे रक्षण करण्यासाठी “व्हॉईस ऑफ मीडिया” कडून विविध पद्धतीने दबाव निर्माण केला जाईल.

error: Content is protected !!