जिल्ह्यात विकासाची क्रांती घडवायची आहे
खा.नारायण राणे यांची वराड काळसे गावांना सदिच्छा भेट
मालवण प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने खा. नारायण राणे यांनी वराड, काळसे गावांना सदिच्छा भेट दिली. यावेळी विकासाची गती निलेश राणे यांच्या माध्यमातून कितीतरी अधिक वेगाने सुरु राहील निलेश राणे यांना बहुमताने विजयी करा असे ग्रामस्थांना आवाहन केले.
दरम्यान यावेळी बोलताना मंत्री नारायण राणे म्हणाले,कोकणची जनता मी माझे कुटुंब मानतो. प्रत्येक गावाशी माझे आपुलकीचे नाते आहे. येथील जनतेचा सर्वांगीण विकास हेच माझे लक्ष आहे. जिल्ह्यात विकासाची क्रांती घडवायची आहे. खासदार निधी बरोबरच केंद्र शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी आणणारच. सोबत मोठ्या मताधिक्याने विजयी होणारे आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर या सर्वांच्या एकत्रित सहभागातून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गतिमान विकासातून कायापालट करणार. असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.विकासाच्या विविध संकल्पनाही त्यांनी ग्रामस्थासमोर मांडल्या.
सोबतच विरोधकांच्या अपयशी कारभारावरही निशाणा साधला. हा मतदारसंघ विकासात मागे गेला. मात्र यापुढे विकासाची गती निलेश राणे यांच्या माध्यमातून कितीतरी अधिक वेगाने सुरु राहील. असेही खा. राणे यांनी स्पष्ट केले.
महायुतीचे आमदार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा; अबीद नाईक
यावेळी ग्रामस्थांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निलेश राणे प्रचंड बहुमताने विजयी होतील. हा विश्वास जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून यावेळी दिसून आला.