
माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या जनता दरबारात नागरिकांचे प्रश्न न सुटल्यामुळेच नितेश राणेंच्या कालच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी झाली होती. यामाध्यमातून नितेश राणेंनी स्वतःच्याच पक्षातील माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण अकार्यक्षम होते हे दाखवून दिले आहे.आणि मुळात रवींद्र चव्हाण अकार्यक्षम होते हे दाखवण्यासाठीच नितेश राणेंनी जनता दरबार आयोजित केला होता का? असा प्रश्न माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.
वैभव नाईक म्हणाले, विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ऑगस्ट २०२४ मध्ये तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी हजारो तक्रारी प्रश्न आल्याचे आणि ते प्रश्न मार्गी लावल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र ते प्रश्न अद्यापही न सुटल्यामुळेच नितेश राणेंच्या कालच्या जनता दरबाराला गर्दी झाली होती. तीन वर्षे भाजप पक्षाची सत्ता असूनही जनतेचे प्रश्न सुटत नाहीत,लोकांना जनता दरबारात गर्दी करावी लागते हे दुर्दैव आहे. नितेश राणेंनी जनता दरबार घेऊन रवींद्र चव्हाण यांची अकार्यक्षमता दाखवून दिली आहेच त्याचबरोबर सत्ताधारी भाजपच्या काळात जनता विविध समस्यांनी त्रस्त आहे हे देखील उघड झाले आहे.अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










