कणकवली : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवली, आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रा २०२५ चैत्र शुद्ध प्रतिपदा रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी संध्या. ४.३० ते ७ या वेळेत संपन्न होईल.
विश्वावसु नाम संवत्सरे, शालीवाहन शके १९४७, गुढीपाडवा सण मोठा, नाही आनंदासी तोटा असं जे म्हटलं जातं ते सत्यच आहे. आपण सर्वांनी या नववर्षाचे स्वागत आपल्या पारंपरिक पध्दतीने करुया.हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती तर्फे आयोजित स्वागत यात्रा कणकवली पंचायत समिती जवळील छ. शिवाजी महाराज चौकातून वाजतगाजत हायवे मार्गे पटवर्धन चौकात येईल व बाजारपेठेतून ढालकाठी मार्गे विद्यामंदिरच्या पटांगणावरील शिवारा मंदिर येथे समारोप होईल.
स्वागतयात्रेत लेझीम पथक, ढोल पथक, दुचाकी पथक, वारकरी दिंडी, विविध देखावे, हिंदू धर्माभिमानी यांचा सहभाग राहिल.