मालवण येथे महिला मेळावा संपन्न

आमदार निलेश राणे यांची उपस्थिती

मालवण : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत पंचायत समिती मालवण, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला बाल कल्याण, उमेद कार्यालय मालवण यांच्या संयुक्त विदयमाने मालवण कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे महिला मेळावा संपन्न झाला, या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.


केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध कोट्यावधी रुपये निधीतून मालवण तालुक्यात सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात विविध प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या. त्या योजनांचे विविध लाभ दिलेल्या योजनांचे प्रतिनिधिक स्वरूपात वितरण लाभार्थीना करण्यात आले.
याप्रसंगी मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. प्रफुल्ल वालावलकर, पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे, शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने, आरोग्य अधिकारी श्री. सुधीर धनगे यांसह अन्य अधिकारी, महिला भगिनी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!