गोठणे-गावठणवाडी ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

कुडाळ-मालवणमध्ये घराणेशाहीला थारा नको- प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया

कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील गोठणे-गावठाणवाडी येथील ग्रामस्थांनी व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.गोठणे गावाचा विकास आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले आहे

प्रवेशकर्ते म्हणाले आमदार वैभव नाईक हे वेळे प्रसंगाला धावून जाणारे आमदार आहेत.त्यांनी शासकीय मेडिकल कॉलेज,महिला बाल रुग्णालय,रस्ते,पूल,पायवाटा अशी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली असल्याचे सांगून कुडाळ-मालवण मध्ये जी घराणेशाही चालू आहे तिला थारा देताकामा नये असे ठणकावून यावेळी सांगितले आहे.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास येथील ग्रामस्थांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत गोठणे गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांना दिला आहे.
यावेळी प्रभाकर घाडीगावकर,नामदेव घाडीगावकर,मोहन घाडीगावकर, बाळकृष्ण घाडीगावकर,हेमंत घाडीगावकर ,प्रवीण घाडीगावकर, प्रमोद घाडीगावकर,अनिल घाडीगावकर,मंगेश घाडीगावकर, विनय घाडीगावकर,अंकिता घाडीगावकर ,हर्षदा घाडीगावकर, नमिता घाडीगावकर,प्राजक्ता घाडीगावकर,मीनाक्षी घाडीगावकर, प्रिया घाडीगावकर,रूपा घाडीगावकर, द्रौपदी घाडीगावकर,तन्वी घाडीगावकर,जयश्री घाडीगावकर, सुचिता घाडीगावकर,अमिता घाडीगावकर या ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
याप्रसंगी आडवली-मालडी विभाग प्रमुख दीपक चव्हाण, महिला विभागप्रमुख आरती हाटले,शाखाप्रमुख जयराम परब, शाखा संघटक दीपक हटले,बूथ प्रमुख विनय परब,युवासेना शाखाप्रमुख अजित घाडीगावकर,शैलेश चव्हाण, सुहास हाटले,मुरली हाटले,रवींद्र परब विलास पवारसअंकुश हाटले,मंजुशा हाटले आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *