कुडाळ : महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर व कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी उपस्थित होते.