आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम
कुडाळ : दिनांक १५,१६ व १७ मार्च रोजी आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दादा साईल मित्र मंडळ पणदूर आयोजित तसेच शिवसेना शाखा पणदुर पुरस्कृत आमदार चषक २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक १५ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजता कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे. यावेळी सामनावीर साठी आकर्षक चषक, मालिकावीर साठी आकर्षक भेटवस्तू व चषक, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आकर्षक भेटवस्तू व चषक दिले जाणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रेक्षकांसाठी मेगा लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये १०० पेक्षा अधिक आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.
तेव्हा सर्व ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













