बांबोळी गोवा येथे एका दुर्धर आजाराशी झुंज देत आहे, शिवराम गावडे
सावंतवाडी : दशावतार क्षेत्रातील एक यूवा तरुण कलाकार कु. शिवराम तानाजी गावडे (रा. वडखोल) हा एका दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. गोवा बांबूळी येथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. उपचारांसाठी त्या कुंटुबियाना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करून सहकार्य करावे, अशी विनंती शिवराम गावडे मित्रमंडळ वडखोल यांनी केली आहे.
शिवराम गावडे हा वालावलकर दशावतार नाट्य कंपनीमध्ये रिद्धी सिद्धी ची भूमिका सादर करुन कलेची सेवा करत होता. त्याच कालावधीत त्याला दुर्धर अशा आजाराने ग्रस्त केल असताना देखील त्याने या सेवेत खंड पडु नये म्हणून एक जवळची कंपनी जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळात कार्यरत राहुन गणरायची सेवा करण्याचे ठरवले. पण कालांतराने त्याच्या आजारपणात वाढ होत गेली, परिणामी डॉक्टर हॉस्पीटल या फेऱ्या वाढल्या आणि आता पर्यंत त्याने आजाराशी झुंज दिली. ही झुंज देत असताना जी काय आयुष्याची कमाई होती नव्हती ती औषधोपचारांसाठी खर्च झाली. यात त्याच्यावर दोन शस्त्रक्रियाही झाल्या आहेत. त्यात आजार हा मिश्र स्वरूपाचा असल्या कारणाणे एका आजारातून बाहेर पडता पडता दुसऱ्या आजाराने गंभीररूप धारण केल. जर कमावती व्यक्तीच जाग्यावर पडली तर आई बापाने बघावे तरी कोणाकडे तरीही त्यांनी आपल्या परिने आपला मुलगा बरा व्हावा म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न केले. हे करत असताना ते कुठेच कमी पडले नाही पण कमी पडली ती त्यांची आर्थिक बाजू. त्यामुळे आता पुढील उपचारांसाठी त्या कुंटुबियाना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. अशा वेळी त्या कुटुंबियांना फुल ना फुलाची पाकळी स्वरुपात दानी वृत्तीने मदत करून शिवराम गावडे यांच्या उपचारासाठी आर्थिक सहकार्य करावयाचे असल्यास श्री. तानाजी गोपीनाथ गावडे
अकाउंट नंबर :071400000002298
IFSC CODE: SIDC0001071
सिंधुदुर्ग बँक Gpay / Phone पाय, गोपीनाथ गावडे -9403302062, या नंबरवर आर्थिक स्वरूपात मदत करून सहकार्य करावे, अशी विनंती शिवराम गावडे मित्रमंडळ वडखोल यांनी केली आहे.













