निरुखे सरपंच किर्तीकुमार तेरसे उपसरपंच रामकृष्ण तेरसे, समाजसेवक आत्माराम निरुखेकर यांचे विशेष सहाय्य
चालक प्रदीप तेरसे आणि वाहक संतोष पालव यांनी बजावली उत्कृष्ट सेवा
कुडाळ : आगारामार्फत आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेसाठी सोडण्यात आलेली निरुखे-आंगणेवाडी विशेष बसफेरी लक्षवेधी ठरली. दरवर्षीप्रमाणे यंदाही आंगणेवाडी जत्रेसाठी निरुखे पंचक्रोशीमधुन आणि मुंबईहुन बरेच भाविक येतात; परंतु या भाविकांना थेट एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे दोन-दोन बसेस बदली कराव्या लागतात. त्यामुळे त्रास सहन करावा लागतो. ही बाब खर्चिक बाब आहे, हे लक्षात येताच निरुखे सरपंच किर्तीकुमार तेरसे आणि उपसरपंच रामकृष्ण तेरसे, समाजसेवक आत्माराम निरुखेकर यांनी कुडाळ आगार व्यवस्थापक यांना लेखी निवेदन देऊन निरुखे-आंगणेवाडी एसटी बसची व्यवस्था केली.
या बसला आकर्षक पद्धतीने फुलांची सजावट केली होती. ही बस दिवसरात्र दिमाखात भगवा झेंडा फडकावत निरुखे ते आंगणेवाडी अशी ये-जा करीत होती. या बस सेवेने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. बसचे चालक प्रदीप तेरसे आणि वाहक संतोष पालव यांनी भाविकांची सेवा बजावली. भाविकांनी त्यांचे कौतुक केले. एसटी बसची सजावट निरुखे गावातील ग्रामस्थांनी केली होती.













