आ. निलेश राणे यांची वचनपूर्ती

मालवण नगरपरिषदेच्या नादुरुस्त घनकचरा मशीन व बायो टॉयलेट्सची स्वखर्चातून दुरुस्ती

मालवण : आ. निलेश राणे यांनी मालवणवासियांना दिलेले वचन पूर्ण केले असून मालवण नगर परिषदेच्या नादुरुस्त घनकचरा मशीन व बायो टॉयलेट्स स्वखर्चातून दुरुस्ती करून आज लोकार्पण करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मालवण बंदर जेटीवर जात मालवण बंदर जेटी, कचरा व्यवस्थापन मशीन व पर्यटकांसाठी बंदर जेटीवर उभारण्यात आलेल्या प्रसाधनगृहाची पाहणी केली होती. तसेच बंदर जेटी स्वच्छ, सुरक्षित व आकर्षक बनवण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांनी आज आश्वासनाची पूर्तता करत मालवण नगरपरिषदेच्या नादुरुस्त घनकचरा मशीन व बायोटोयलेट्स स्वखर्चातून दुरुस्ती करून लोकार्पण करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजप शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!