राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्यावतीने कणकवली प्रातांधिका-यांना निवेदन ; हळवल फाट्यावर होणा-या अपघाताला जबाबदार कोण ?
कणकवली : हळवल फाट्यावर होत असलेल्या अपघातामुळे महामार्ग धोकादायक बनत आहे. अपघातात अनेकांचा मृत्यू होत असल्याने स्पीड बेकर घालण्यात यावेत, अशी मागणी गेल्या वर्षभरापूर्वीपासून आम्ही करत आहोत. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणने तात्काळ रबलर स्वरूपाचे स्पीड बेकर घातले होते. त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही, त्यानंतर हळवल फाट्यावर अपघात होवून अनेकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे महामार्गावर हळवल फाट्यावरील अपघात रोखण्यासाठी डांबरी स्वरुपाचे स्पीड बेकर घालण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक नाईक यांनी केली आहे. होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणकडून काही उपाययोजना झालेली नाही. एक महिन्याच्या कालावधीत ही व्यवस्था करावी, तसे न केल्यास महामार्गावर माती टाकून महामार्ग रोखण्यात येईल, तसेच मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी त्या हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे त्यांनी ही उपाययोजना नाही केली तर हायवेच्या कार्यालयाला आम्ही राष्ट्रवादीतर्फे टाळे ठोकणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
राजापूर पासून जे जे अपघात क्षेत्र आहेत, तिथे डांबरी स्वरूपाची स्पीड बेकर घालून वेग नियंत्रण करण्यात आलेला आहे. आणि मोठा उतार असलेल्या पूलांवर देखील स्पीड बेकर घातलेले आहेत. परंतु पुन्हा कोल्हापूर सारख्या सहा पदरी हायवेवर सुद्धा अपघात रोखण्यासाठी डांबरी पद्धतीचे स्पीड बेकर घालण्यात आलेले आहेत. त्याच प्रकारचे मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाट्यापूर्वी स्पीड बेकर घालावे अशी आमची मागणी आहे. त्यावर प्रांताधिका-यांनी योग्य ती आश्वासन दिल्याचे अबिद नाईक यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, सरचिटणीस सावळाराम अनावकर, तालुकाध्यक्ष राजू पावसकर, विलास गावकर, निशांत कडूलकर, केदार खोत, इम्रान शेख, मुश्ताक काझी, शब्बीर शेख, कृष्णा गावकर, प्रथमेश गोसावी, प्रेमानंद नाईक, सूर्यकांत नाईक, अशोक पेडणेकर, विजय तेजम, प्रकाश पालव, किशोर तेली, संतोष गावकर, चंद्रकांत मेस्त्री, श्रद्धा गावकर, स्नेहा गावकर, संजना गावकर, क्षमा गावकर, दर्शना घाडीगावकर आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













